अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्रराज्य व श्री साई समर्थ इन्स्टिटयूट अँड रिसर्च सेंटर भडगांव जि.जळगाव यांच्या संयुक्त विधमाने मोठ्या उत्साहात साजरा.

25 सप्टेंबर 2024 जागतिक फार्मासिस्ट दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित असलेले अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेश सचिव रोहित वाघ, नाशिक विभागीय अध्यक्ष मा.प्रा. सुशील डी पाटील, नाशिक विभागीय सचिव डॉ. मनोज पाटील (प्रा.शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च पाचोरा), जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ.महेंद्र पाटील(प्रा.श्री साई समर्थ इन्स्टिटयूट अँड रिसर्च सेंटर भडगाव).मा.ईश्वर पाडवी (युवा अध्यक्ष नंदुरबार जिल्हा) व संघटनेचे सर्व पदाधिकारी.


तसेच उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मा.डॉ. अनिल माणिकराव(असिस्टंट ड्रॅग कमिशनर, जळगाव) व मा. श्री. भैय्यासाहेब पाटील (अध्यक्ष बापूसो पुं.का पाटील शिक्षण संस्था भडगाव).
तसेच रक्तदान शिबीर, वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आले. व विद्यार्थ्यां मार्फत फार्मासिस्ट दिनाचे औचित साधून फार्मसी विद्यार्थ्यांनी फार्मासिस्टच्या भूमिकेमधले नृत्य केले
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे.


डॉ अनिल माणिकराव यांनी आपल्या भाषणामध्ये असे सांगितले की आपण कॉलेजला शिकत असताना.


औषधाबद्दलची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे त्यामध्ये डोज कॉन्ट्रॅक्टेशन मेकॅनिझम ॲक्शन याची माहिती विद्यार्थ्यांना असायला हवी .आपण स्वतःला कमी समजू नका फार्मासिस्ट काय करू शकतो हे आपण कोविडच्या काळामध्ये दाखवून दिलं असं प्रतिपादन डॉ अनिल माणिकराव सर यांनी केले.


आले ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा भैय्यासाहेब पाटील (श्री साई समर्थ इन्स्टिट्यूट व रिसर्च सेंटर भडगाव व शिवसेना सह संपर्कप्रमुख जळगाव) यांनी संवाद साधताना असे सांगितले की फार्मासिस्ट व फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या असंख्य असे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवायला कुणीही समोर यायला तयार नाही आपलं आखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन हे पुढे आले आहे.


त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो व फार्मसी च्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण लवकरच मा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्यांच्यासोबत मिटींग लावू असे मत भैय्यासाहेब पाटील यांनी व्यक्त केले ,कार्यक्रमाचे वक्ते मा सुशील डी पाटील त्यांच्यामार्फत फार्मासिट दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व
कोविडच्या काळामध्ये फार्मासिस्टनी केलेल्या कार्याचं कौतुक व फ्रंट लाईन वर्कर म्हणून फार्मासिस्टला सहभागी केले नाही याचे दुःख त्यांनी व्यक्त केले.


व आखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे यांनी बोलताना असे सांगितले की फार्मसीच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे व वाढणारी फार्मासिस्ट फार्मासिस्ट बेरोजगारी ,असंख्य असे प्रश्न त्यासोबत रखडलेले जीपॅडचे टायफंड व डी फार्मसीच्या एक्झिट एक्झामला असलेली फीस ही कमी करण्यात यावी यासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया व महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल कुठलेही पावले उचलत नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.


व फार्मसी प्रॅक्टिस रेगुलेशन अॅक्ट 2015 हा महाराष्ट्र मध्ये लागू होण्यासाठी महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल पुढाकार घेत नाही असे त्यांनी बोलताना सांगितले
अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेमार्फत जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री साई समर्थ रीसर्च इन्स्टिट्यूट कॉलेजचे प्राचार्य डॉ महेंद्र पाटील सर यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व डॉक्टर मनोज पाटील शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांची नाशिक विभागीय सचिव पद्धतीने नियुक्ती करण्यात आली व त्यासोबत जळगाव जिल्ह्याची युवा कार्य करण्याची निवड करण्यात आली.अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन तर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे व कॉलेज चे सर्व शिक्षक यांना पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आले.

शेयर करने के लिए धन्यवाद्

You may also like...